प्रत्येक गावाला मिळणार ग्रामसेवक-पंकजा मुंडे

0
10

नागपूर – सध्या एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावे असल्याने गावातील लोकांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत यापुढे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामसेवक देण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिले. रिक्त पदेही लवकरात लवकर भरली जातील, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने गावातील विकासकामे खोळंबत असल्याबाबतचा प्रश्न खामगावचे आमदारचे अॅड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत उपस्थितीत केला होता. त्याला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘ग्रामसेवकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत, हे खरे आहे.
म्हणूनच कमी क्षमतेच्या दोन-तीन गावांना मिळून एक ग्रामसेवक दिला जातो. त्यामुळे विकासकामे रेंगाळली जातात हे खरे नाही. मात्र या कामावर नक्कीच परिणाम होतो. म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक नेमण्याबाबत सरकार विचार करील, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले