मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक

0
9

वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल, दि. 1 – लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत – नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे. मंगळवारी रात्री उशीरा सीआयडीच्या पथकाने खारीवाडी पोसिल स्थानकाच्या परिसरात जुही चौधरींना अटक केली.
जुहीच्या अटकेसाठी तृणमूलच्या युवक विद्यार्थी संघटनेनं अंदोलने केली होती. जुहीचे वडिल रविंद्र चौधरी भाजपाचे पश्चिम बंगाल राज्याचे सचिव आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, यापुर्वी लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी चंदना चक्रवर्तीने भाजपा नेत्या रुपा गांगुली, कैलाश विजयवर्गीय आणि जूही चौधरी यांचे नाव घेतले होते. 18 फेब्रुवारी रोजी सीआयडीने विमला शिशूगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांना अटक केली होती, त्यांना सहअरोपी म्हणून अटक करण्यात आल्याचे प्रथमिक वृत्त आहे.