समाजबांधवांनी महापुरुषांचा आदर्श बाळगा : बडोले

0
17

गोंदिया दि.०१ मार्च: ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपल्यावर उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांनी समाजासाठी आपल्या जिवाचेदेखील बलिदान दिले. रमाबाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तर क्रांतीदायी आहे. या महापुरुषांचा समाजबांधवांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.लॉर्ड बुद्धा मैत्री संघ व लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गोंदियातील रेल्वे ग्राऊंडवर साजरी करण्यात आली, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाच्या वैशाली डोळस यांनी महिलांना जिजाऊ, सावित्री आणि रमाई यांचा त्याग डोळ्य़ासमोर ठेवून आपल्या पाल्यांना संस्कारित करावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी भय्यासाहेब खैरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रतन वासनिक, न.प.उपाध्यक्ष डॉ.प्रशांत मेश्राम, नीरज कटकवार, रजनी मेश्राम, चक्रधर ठवले, सुनील आवळे, डॉ.सूरज पाल, इंजि.आर.वरून, देवा रूसे, भाऊलाल तरोणे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात १६ समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर बुद्ध-भीम, रमाई, सुफी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम झाला. यशस्वितेसाठी रंजित बन्सोड, विनोद जांभुळकर, राजेश भोयर, कैलाश गजभिये, अक्षय वासनिक, आदित्य मेश्राम, हर्ष मेश्राम, मीरा चिंचखेडे, सुनील आवळे, अनिल मिश्रा यांनी सहकार्य केले.