एसपी शिवदीप लांडेंनी लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडलं

0
7

पाटणा: खरोखरच्या सिंघमनं एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पडकलं ते ही दबंग स्टाइलनं… पाटण्याचे एसपी शिवदीप लांडे यांनी वेष बदलून क्राइम ब्रँचच्या एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली.

मोबाईल दुकानाच्या मालकाला धमकावून वसूली केल्याचा आरोप अटक करण्यात आलेल्या सर्वचंद्र नावाच्या इन्स्पेक्टरवर आहे. या कारवाईत शिवदीप लांडे यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. फिल्मी अंदाजात त्यांनी वेश बदलून लेडी अवतारात ही कारवाई केलीय. मात्र आता शिवदीप लांडे यांच्या या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला जातोय.

सविस्तर घटना अशी आहे की, एक पोलीस इंस्पेक्टर एका व्यापाऱ्याला धमकी देत होता. व्यापाऱ्यानं त्याची तक्रार एसपी लांडे यांच्याकडे केली. सकाळी 6 वाजता डाकबंगला चौकातमध्ये दोन तरूणांनी फोन करून एका पोलीस वेषातील व्यक्तीला बोलावलं. यादरम्यान तिथं वेष बदलून शिवदीप लांडे आणि त्यांची टीम आधीपासूनच उपस्थित होती. पैसे हाती घेताच त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला पकडलं. शिवदीप लांडे यांनी आपल्या डोक्यावर पदर घेत वेष बदलला होता