शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ

0
14

मुंबई-राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त मिळलेला नाही. शिवसेनेच्या कोट्यातील दोन राज्यमंत्रिपदं शिल्लक आहे त्यासाठी बड्या सहा नेत्यांमध्ये चुरस सुरू आहे. सेनेच्या गोटातून नीलम गोर्‍हे, गुलाबराव पाटील, विजय औटी, अर्जुन खोतकर, राजेश क्षिरसागर, सुजित मिंचेकर यांची नावं चर्चेत आहे. तर भाजपच्या आमदारांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीये.

शिवसेनेचा सत्तेत सहभाग झाल्यानंतर युती सरकारचा संसार आता सुखाने सुरू आहे. 10 मंत्रिपदांच्या मोबदल्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाली. शिवसेनेच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पण आणखी दोन राज्यमंत्रिपदं सेनेकडे शिल्लक आहे. या दोन पदांसाठी सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झालीये. पण शिवसेना आणि भाजपामध्ये असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला स्थान द्यावं याबाबत शिवसेनेनं अजूनही नावं कळवलेलं नाही. त्यामुळेच विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती भाजपच्या सुत्रांकडून देण्यात आलीये. शिवसेनेच्या कोट्यात दोन राज्यमंत्रिपदं शिल्लक आहेत. त्यासाठी सहा मोठे नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. नीलम गोर्‍हे, गुलाबराव पाटील, विजय औटी, अर्जुन खोतकर, राजेश क्षिरसागर, सुजित मिंचेकर यांची नावं चर्चेत आहे. विशेष म्हणजे सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांचं नावं मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून चर्चेत आहे. पण त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा राज्यमंत्रिपदासाठी नीलम गोर्‍हे यांचं नावं चर्चेत आलंय. सेनेच्या गोटात रस्सीखेच सुरू आहे. अशीच अवस्था भाजपच्या गोटातही आहे. भाजपच्या नेत्यांनी मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. यासाठी आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा,पांडूरंग फुंडकर, चैनसुख संचेती यांच्यासह वेगवेगळ्या विभागातून अनेक नेते मंत्रिपदासाठी उत्सुक आहे.