मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या श्रीमुखात भडकावली!

0
13

तमलूक: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. मात्र मारहाण करणारा व्यक्ती पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचा दावा पक्षाने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमुखात मारणारा कार्यकर्ता हा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे भाषण सुरू असताना अचानक हा व्यक्ती व्यासपीठावर चढला आणि त्याने त्यांच्या श्रीमुखात भडकावली.

या घटनेनंतर व्यासपीठावरील संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले आणि चांगलेच फटकावले. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो व्यक्ती पक्षाचा कार्यकर्ता नसून कोणीतरी बाहेरचा व्यक्ती असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे.

या व्यक्तीने बॅनर्जी यांना मारहाण का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर सभास्थळी मोठी खळबळ माजली आणि हा कार्यक्रम थांबवण्यात आला.