25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राष्ट्रीय देश कार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया

कार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया

0
23

सूरत दि.७:(वृत्तसंस्था)-विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या कारला बुधवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातातून ते बचावले आहेत. अपघातानंतर तोगडिया म्हणाले की, हा माझ्या हत्येचा कट आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात अचानक बेपत्ता झाल्यानंतर 12 तासांनी रस्त्याच्या कडेला ते बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यावेळी त्यांनी सीबीआय एन्काऊन्टरचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे की, ‘झेड प्लस सुरक्षा असतानाही पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवत नाही आहेत’. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण तोगडिया यांच्या कारला मागून येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. पोलिसांना आपण जात असलेल्या मार्गाची आधीच माहिती देण्यात आली होती असं प्रवीण तोगडिया यांनी सांगितलं आहे. आपण राज्य सरकारकडे सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याची तक्रार करणार असल्याचंही ते बोलले आहेत. ‘बुलेटप्रुफ कार नसती तर कोणीही जिवंत राहिले नसते’, असा दावा प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.