24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News सरन्यायाधीश’पदी शरद बोबडे विराजमान,राष्ट्रपतींनी दिली शपथ

सरन्यायाधीश’पदी शरद बोबडे विराजमान,राष्ट्रपतींनी दिली शपथ

0
37

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.18 : सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडेंना गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, शरद बोबडेंनी सभागृहात उपस्थित सर्वांना अभिवादन करुन आभार मानले. स्वीकारतील. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला आहे. शरद बोबडेंच्यारुपाने मराठमोळा माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चस्थानी विराजमान झाला आहे. सन 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची 65 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची 18 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले होते. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींची उपस्थिती या सोहळ्यात लक्षणीय ठरली. बोबडेंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.न्या. बोबडे मुळचे नागपूरचे असल्याने व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी अनेक वर्षे प्रॅक्टीस केल्याने नागपुरातील बहुतांश मंडळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सांबरे, महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांच्यासह आदी मंडळीचा समावेश होता.