– मानसाने पहिल्यांदा कुत्र्याला मित्र केले मग स्वार्थापोटी गुलाम केले आणि एवढे गुलाम केले की कुत्रा माणसा समोर लाचार झाला, एवढा लाचार झाला की माणसाने फटके मारले तरी त्याच्यापुढे शेपटी हलवत फटके खातो. काहीही झाले तरी आता तो माणसाची गुलामी गुलामी सोडणार नाही.
– शेतकऱ्याने सांडाला प्रेमाने जवळ केले मग त्याला आपल्या कामासाठी गुलाम केले आणि एवढे गुलाम केले की त्याच्या बच्च्यासाठी असलेले दूध आपल्या बच्च्यासाठी व आपल्यासाठी वापरले एवढेच नाही तर त्याची नसबंदी करून त्याला नैसर्गिक सेक्सच्या सुखापासून वंचित केले व त्याचा बैल बनवला तरी सांडाने विद्रोह केला नाही,आता कधीकाळी मदमस्त सांड असलेला हा प्राणी एवढा बैल झाला की त्याला आता बैलगिरीतच आनंद वाटायला लागला.आता हा त्याची बैलगीरी सोडणार नाही म्हणजेच गुलामी सोडणार नाही.
-कुंभाराने गाढवाला पकडून कामाला जुंपले, गाढवाने विरोध जरूर केला पण पोटभर जेवण मिळाल्यामुळे गाढवही खुश झाले.आता कुंभाराने त्याची कमजोरी पकडली आणि जेवणही कमी केलं आणि गाढवानेही ते सहन केले आता गाढव हळूहळू कुंभाराचे गुलाम झाले गाढवाला आता कुंभाराची व गुलामीची एवढी सवय झाली की त्याला वाटतच नाही की तो कुंभाराचा गुलाम आहे.
– घोड्याचा धावण्याचा वेग आणि रुबाब पाहून सैनिकाने घोड्याला पकडले व त्याच्या पाठीवर बसला घोड्याने पूर्ण शक्तिनिशी विरोध केला पण शेवटी सैनिकांने त्याला कधी प्रेमाने तर कधी फटक्याने वश केले लढाई करणे ही सैनिकांची गरज होती घोड्याची नाही पण हळूहळू या सैनिकांने घोड्याला आपला गुलाम केले व लढाईसाठी वापरले आणि घोडा आता सैनिकाची गुलामी वाहण्यात आपली शान समजू लागला पण प्रत्यक्षात आहे तो सैनिकाचा गुलामच, गुलामी आता त्याच्या एवढी अंगवळणी पडली की तो लग्नाच्या वराती समोर ढपक्यासारखा नाचतो पण गुलामीतून मुक्त व्हायचा प्रयत्नही करीत नाही.
जुन्या काळात जंगलातून मोठमोठी लाकडे आणने म्हणजे कठीण काम होते पण माणसाने डोके वापरले,हत्तीला प्रेमाने जवळ केले त्याच्या अंगावरून हात फिरवला व हळूहळू त्याला गुलाम केले.आता हा माहूत या शक्तिमान प्राण्याकडून मोठमोठी कामे करून घ्यायला लागला.अगोदर हा त्याला साखळदंडाने बांधायचा आता हत्ती नावाच्या गुलामाला फक्त साध्या दोरीने बांधतो कारण हा हत्ती आता या माहुताचा गुलाम झालेला आहे .
गुलाम करायची प्रक्रिया फार प्राचीन आहे ही प्रक्रिया माणसानेच निर्माण केलेली आहे, व या प्रक्रियेद्वारे शक्तिमान मानसांनी शक्तीहीन लोकांना व बुद्धिमान मानसांनी बुद्धीहीन लोकांना गुलाम केलेले आहे व स्वतःसाठी वापरले आहेत याची कित्येक उदाहरणे इतिहासात सापडतील.प्राण्याने प्राण्यांना कधिही गुलाम केलेले नाही प्राण्याने प्राण्याला गुलाम केल्याचे उदाहरण सापडत नाही पण माणसाने माणसाला गुलाम केलेले आहे.
पण जेव्हा गुलामांना संधी मिळाली तेव्हा गुलामांनीही त्यांच्या मालकांना संपवून टाकले व मुक्त झालेले आहेत असेही उदाहरणे इतिहासात भरपुर सापडतात,म्हणूनच जगात बहुतांशी मानव स्वतंत्र आहे.पण प्राणी मात्र माणसा विरुद्ध असे करणार नाही कारण त्याची बुद्धी ही मर्यादित आहे.
जेव्हा इथल्या बुद्धिमान पण धूर्त माणसांना असे वाटले की आता यापुढे सामान्य माणसाला गुलाम ठेवणे शक्य नाही तेव्हाच या धूर्त माणसाने मानसाला गुलाम ठेवण्यासाठी ईश्वरी संकल्पनेचा सहारा घेतला व माणसाला गुलाम ठेवलेले आहे व आजही इश्वरी या संकल्पनेची माणसे गुलाम झालेली आहेत त्यामुळे मंदिरात एका दगडाला कोट्यावधी रुपयाचे दान देऊन ईश्वराच्या नावाखाली आपल्या मालकाच्या जगण्याची व ऐशोआरामाची सोय आजही गुलाम माणसे करीत आहेत.
आज कोरोना वायरस ने हे स्पष्ट दाखवून दिले आहे की जगात कोणीही ईश्वर नाही,अल्ला नाही,परमेश्वर नाही कारण असता तर तो त्याच्या बंद्यासाठी,भक्तासाठी अनुयायांसाठी आज नक्कीच धावून आला असता. आज ईश्वरी संकल्पनेचे ढोंग उघडे होवून “दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे” तरीपण हे ईश्वरी,परमेश्वरी संकल्पनेचे गुलाममानव मात्र गुलामच राहतील कारण या इश्वरीसंकल्पनेच्या माध्यमातूनच यांची बुद्धी गोठवण्यात आलेली आहे, आता यांनाही कुत्र्यासारखी ,बैलासारखी, गाढवासारखी, घोड्यासारखी व हत्तीसारखी गुलामीची सवय झालेली आहे त्यामुळे यांच्या जिवनाचा महत्वपुर्ण घटक म्हणजे यांचा वेळ,श्रम,बुध्दी व पैसा हा अनुत्पादक कार्यात बर्बाद होत आहे,म्हणजेच यांचे जिवन बर्बाद होत आहे.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की
” गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल ” पण बंड तोच करतो जो स्वतःला गुलाम समजतो. बाबासाहेबांनी दलित लोकांना गुलामीची जाणीव करून दिल्यामुळे समाजातील माझ्यासारखे कित्येक माणसांनी इश्वरीगुलामी विरुद्ध बंड केले आहे व ईश्वराला एका झटक्यात फेकून दिलेले आहे. भारतात ईश्वरी संकल्पनेचा उपयोग लोकांना कायमचे गुलाम ठेवण्याकरिता झालेला आहे व होत आहे म्हणून या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ईश्वरी संकल्पनेला फेकून देणे ही काळाची गरज आहे ईश्वरी संकल्पनेला फेकून दिल्यास बहुजनसमाज ब्राह्मणाच्या गुलामीतून नक्कीच मुक्त होईल अन्यथा गुलामीतच सडणार आहे.




