27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राष्ट्रीय देश सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी राजीनामा मागे घेतला

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी राजीनामा मागे घेतला

0
683

वर्धा, 14 जून  :मागील महिन्यात राजीनामा दिलेले सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे पत्र सदस्यांना दिले आहे. त्यामुळे सेवाग्राम आश्रमाच्या व्यवस्थापनातील गोंधळात आणखी भर पडली आहे.

अध्यक्षपदावरून तत्कालीन अध्यक्ष टी.आर. एन. प्रभू यांना मार्च महिन्यात पदावरून हटविण्यात ाले होते. त्यानंतर महादेव विद्रोही यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. हा वाद चव्हाट्यावर आला होता. या गोंदळावर तोडगा काढण्यासाठी सर्व सेवा संघाच्या सदस्यांची झूम अ‍ॅपच्या माध्यमातून बैठक झाली. त्यात अध्यक्षपदाचा वाद आणि इतर समस्या सोडविण्यासाठी जयपूर येथील भवानी शंकर कुसूम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. मात्र, समितीचा अहवाल येण्यापूर्वीच माजी अध्यक्ष प्रभू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे पत्र सर्व सदस्यांना दिले. आश्रमाच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने आपण राजीनामा दिला होता.  देशभरातील गांधीवादी कार्यकर्त्यांची मी  या पदावर कायम राहावे, अशी इच्छा आहे. तसेच सर्व सेवा संघाने माझा राजीनामा मंजूर केला नवह्ता. याबाबत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांच्याशी मी चर्चा केली आहे, असे प्रभू यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.