पाकिस्तानची संसद बरखास्त, ९० दिवसांत निवडणुका

0
19

पाकिस्तानात मोठी राजकीय खळबळ माजवणारी बातमी आली आहे. संसद बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपतींनी मान्य केली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव डेप्युटी स्पीकर कासीम सुरी यांनी फेटाळून लावला आहे. या घडामोडीनंतर इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची मागणी केली होती. संसद बरखास्त करुन नव्याने निवडणुका घेऊन जनतेचा कौल घ्यावा, अशी मागणी त्यांनी देशवासीयांसमोर येत केली होती. इम्रान खान यावेळी संसदेत उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी राष्ट्रपतींना तत्काळ पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं होतं. आता इम्रान खान यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. मी राष्ट्रपतींना विनंती करतो की त्यांनी हे मंत्रिमंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्या, असं खान यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी त्यांची मागणी मान्य करत संसद बरखास्त केली आहे. त्यामुळे आता तिकडे मध्यामधी निवडणुका होणार आहेत.