वेदनावरील संयम म्हणजे दुःखातून मुक्तीचा मार्ग

0
34

प्रबोधनकार संकल्प यांचे प्रतिपादन

संथागारात 378 वी धम्म असेम्ब्लीचे आयोजन

गोंदिया ता.3:-वेदनानंवर संयम ठेवा म्हणजे दुःखातून मुक्ती मिळते असे विचार प्रबोधनकार एस. एन. संकल्प यांनी मांडले.
बुद्धिस्ट समाज संघाच्या वतीने संथागारात आयोजित 378 व्या संडे असेम्बली दरम्यान ते बोलत होते.
आयु. संकल्प यांनी बुद्धाने प्रतिपादित केलेल्या 4 आर्य सत्य आणि विप्स्सणा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रबोधनकार पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक व्यक्तींनी अहंकार आणि अभिमान या दोहोंचा त्याग केला पाहिजे, कारण जो पर्यन्त “मै “हा शरीरात वास्तव्याला आहे तो पर्यन्त निर्वाण प्राप्त होत नाही.शरीराच्या पायाभूत गरजा पूर्ण करत करत व्यक्ती निर्वाण प्राप्त करू शकतो असा युक्तिवाद त्यांनी करून विविध उदाहरणांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की,
भावचकरातून मुक्ती मिळविण्यासाठी 10 पारमितांची गरज आहे, त्यामुळे सर्व बुद्धिष्टानी पारमितेचे पालन करावे कारण जे पंचशीलाचे पालन करतात त्यांची साधना चांगली असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग हे दुःख निवारण्याचे साधन आहे असा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला. दरम्यान बुध्दवंदना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. तदनंतर डॉ.कान्हेकर साहेब आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मरस्कोल्हे साहेब यांनी B4 अर्थात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन ही काळाची गरज आहे,यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. आयु. गौतम गजभिये यांनी संचालन केले. सर्वांचे भले हो, माझंही भले हो या धम्मगाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. वैद्य कुटुंबाकडून लज्जतदार भोजनदान करण्यात आलं.
यावेळी बुद्धिस्ट समाज संघांचे उपासक उपस्थित होते.