39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय नगरविकास मंत्री व गडचिरोली-ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

नगरविकास मंत्री व गडचिरोली-ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

0
614

blank

ठाणे,दि.24 : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले,;काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती

blank