पवार बोलतात ते कधीच करत नाहीत- उध्दव ठाकरे

0
19
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई-शरद पवारांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत असा इतिहास आहे, अशा खोचक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणारे पवार आज मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याचे विधान करतात. त्यामुळे पवार कधी काय बोलतात हे त्यांच्याच लक्षात राहत नाही. मतदार राजा पवार साहेबांना माफ कर, पवार काय करतात आणि काय बोलतात हे त्यांना कळत नाही, असा उपरोधिक टोला उध्दव यांनी पवारांना लगावला तर, ज्यांच्याबरोबर गेली २५ वर्षे राहिलो ते या निवडणुकीत आमच्या विरोधात लढले आणि आम्ही ज्यांच्या विरोधात होतो त्यांना ते सोबत घेत आहेत. त्यामुळे दुर्देवाने कोण कोणाबरोबर आहे ते कळतच नाही, अशी उध्दव यांनी भाजपवर टीका केली.