गोंदिया,दि.18ः गोंदिया जिल्ह्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुलभाई पटेलांच्या अवतीभवती फिरणारे असून त्यांनी जो शब्द टाकला तो राष्ट्रवादीच्या प्रत्येकासाठी अंतिम निर्णय असतो.परंतु आता राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी प्रफुलभांईशी संबध चांगले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आणि विधानसभा निवडणुक लढविलेले अशोक (गप्पू)गुप्ता यांनी येत्या 20 आँक्टोबंरला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या मार्गदर्शनात काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत.राष्ट्रवादीचा युवा नेता काँग्रेस प्रवेश करणार असी बातमी बेरार टाईम्सने आपल्या 14 आँक्टोंबरच्या अंकात प्रकाशित केली होती.त्यावर शिक्कामोर्तंब होताना दिसून येत असून अशोक गुप्ता यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत पुर्ण प्रकिया व चर्चा केली आहे.त्यातच दोन दिवसापुर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याची नागपूरात भेट घेऊन त्यांनाही आपला निर्णय कळविला आहे.
गुप्ता यांनी भविष्यातील विधानसभा निवडणुक लक्षात घेता आत्तापासूनच आपण कुठेतरी सक्षमपणे काम केले पाहिजे या भूमिकेला स्विकारत येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय राजकीय दृष्टीने योग्य असल्याचे मत व्यक्त केले जाऊ लागले आहे.सदर राष्ट्रवादीचा हा युवा नेता आपल्यासोबत एक चांगळी फळी आणि काही युवा नेत्यांना सोबत घेत आज 18 आँक्टोंबरला विदर्भ एक्सप्रेसने काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव किरसान यांच्यासोबत रवाना झाले आहेत.गुप्ता यांच्या प्रवेशाने काँग्रेसला गोंदिया विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर आमगावसह इतर मतदारसंघातही बळकटी मिळवून देण्यात महत्वाचा ठरणार आहे.तर एक माजी आमदार सुद्दा येत्या वर्षभरात काँगे्रसमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही त्या गटाकडून वर्तविली जात आहे. गुप्ता यांना गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या कुठल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला सोबत घेऊन यायचे आहे,यासंदर्भातील सुचना सुध्दा विधानसभा अध्यक्षांनी दिल्याचे वृत्त आहे.गुप्ता यांच्यासोबत जिल्हापातळीवरील काँग्रेसच्या विविध आघाडीचे जिल्हाध्यक्षही रवाना होत आहेत.