मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावे- डॉ. आशीष देशमुख

0
290

नागपूर,दि.23 : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. विदर्भातील शेतकरी मदतीची वाट बघत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात येऊन शेतकर्यांना ठोस मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली आहे.

यंदा मान्सून वेळेवर धडकला. जून, जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाला. या व सततच्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकNयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नदी, नाले व सर्वच शेतात तुडुंब पाणी भरले. सोयाबीन व कापसाचे अतोनात नुकसान झाले, शेती वाहून गेली. नागपूर विभागात ६३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात ५० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. अकोला येथील शहापूर धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील सर्व पिके वाया गेली. कोविडच्या महामारीने जनता आधीच त्रस्त असतांना या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारतर्फे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करुन योग्य मदतीची गरज आहे.

बॉक्ससाठी ०

दिवाळी जाणार अंधारात !

शेतकNयांवर बँकेचे कर्ज आहे, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शेतकNयांची दिवाळी अंधारात जाणार आहे. विदर्भातील शेतकरी मायबाप सरकार येईल आणि मदत करेल, या अपेक्षेसह वाट बघत आहेत. त्यामुळं ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीची पाहणी करून शेतकNयांचे सांत्वन करून मदतीचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे विदर्भातही येऊन शेतकNयांना दिलासा द्यावा, जेणेकरून विदर्भातील शेतकNयांमध्ये दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होणार नाही’, अशी अपेक्षा डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.