आयपीएल जुगार अड्डय़ावर धाड

0
284

गोंदिया,दि.23ःदुबई येथे सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर आभासी पद्धतीने सिव्हिल लाईन येथील जुगार अड्डयावर धाड टाकून पोलिसांनी ३५ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई २0 ऑक्टोबर रोजी रात्री १0 वाजता केली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी सिव्हिल लाईन येथील सुधांशू अशोक पांडे याच्या घरी रात्री १0 वाजता धाड टाकली. यावेळी तो राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर 0कग्स या सामन्यावर क्रिकेट घोडा एक्सचेंज अँपवर क्रिकेट बेटींग करीत असल्याचे आढळले. दरम्यान, आरोपीने त्याने नागपूर येथील तुषार माहुले यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी आयडी व पासवर्ड विकत घेतल्याचे सांगून अर्जुनी मोर येथील जमीन पालिवाल अर्जुनी मोर व पारस चंदेल, लांजी येथील दुर्गेश डोंगरे व सोनू आणि नागपूर येथील निरज राठोड यांच्याकडून आभासी पद्धतीने क्रिकेट सट्टा लावल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ३५ हजार किंमतीचे दोन मोबाईल जप्त केले असून शहर पोलिस ठाण्यात कलम ४, ५ मजुका सहकलम १0९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, कैलाश गवते, पोलिस कर्मचारी रविकांत दराडे, जागेश्‍वर उईके, ओमेश्‍वर मेर्शाम, सुबोधकुमार बिसेन, योगेश बिसेन, छगन विठ्ठले, विनोद शहारे, रॉबीनसन साठे, रवी राठोड यांनी केली.