नागपूर-पुणे-नागपूर-गोंदिया शिवशाही बस सुरू

0
494

नागपूर,दि.23 :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातर्पेâ २ ऑक्टोबरपासून नागपूर-पुणे-नागपूर वातानुकुलीत १० शिवशाही बसेस सुरू करण्यात आली आहे.तर नागपूर-गोंदिया-भंडारा -नागपूर मार्गावरही शिवशाही सुरु करण्यात आली आहे.
पुणेकरिता नागपूर येथून दुपारी १३.००, १५.००. १६.००. १६.३०, १७.००. १७.३०, १८.००, १८.३०, १९.०० आणि २०.३० पर्यंत एवूâण १० बसेस निघत आहेत. या बसेसचे आरक्षणासहीत १३८० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. नागपूर-पुणे बस अमरावती, अकोला, खामगाव, चिखली, जालना, औरंगाबाद, अहमदनगर मार्गे पुणे येथे जाते. त्याचप्रमाणे पुणे येथून नागपूरकरता १३.००, १५.००, १६.००, १६.३०, १७.००, १७.३०, १८.००, १८.३०, १९.०० आणि २०.३० वाजता सुटते. या बसेससचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक निलेश बेसलरे यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेंâद्र आणि राज्य सरकारने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन घोषित केल्यामुळे रा.प. महामंडळाची सर्व बस वाहतूक ठप्प झाली होती. २९ ऑगस्टपासून काही दिवस टप्प्याटप्प्याने ५० टक्के प्रवासी क्षमता वाहतूक सुरू केल्यानंतर राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे रा.प. महामंडळाने १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.