
तिरोडा,01- शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण प्रयत्नरत आहो. जिल्ह्यातील सिंचन सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रलंबित प्रकरणांची कामे लावण्यात येत आहे. यासाठी बावनथडी, सोंड्याटोला, धापेवाडा हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून धापेवाड्याचे उर्वरित काम आणि गोंदिया तालुक्यातील अनेक उपसा सिंचनाचा मार्ग मोकळा करुन हरितक्रांती परिसरात दिसून येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले. तिरोडा येथील कुंभारे लाॅन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शासनातर्फे धानाला २५८८ रुपये बोनससह भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानण्यात आले.सभेचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनी केले.सभेला माजी खासदार डाॅ. खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,माजी सभापती निता रहागंडाले,रायुकाँ नेता रविकांत बोपचे,माजी नगराध्यक्ष अजय गौर,तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षबळकटीवर अनेक उपाय सुचवले.त्यावर बोलतांना पक्षासाठी इमानेइतबारे जो काम करेल आणि पक्षाच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी जो काम करेल त्याचा पक्ष नेहमीचा सकारात्मक विचार करेल येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जो विजय मिळवू शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल असे यावेळी खा.पटेल यांनी स्पष्ट करीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात किंवा पक्षविरोधाकांच्या सोबत काम करणार्यांना इशारा दिला.बैठकीचे संचालन डाॅ.अविनाश जायस्वाल यांनी केले.सभेला शहर अध्यक्ष जिब्राईल पठान, राजकुमार केसरवानी,प्रभु असाटी, नरेश कुंभारे, जगदीश कटरे, विजय बंसोड, ममता बैस, रामकुमार असाटी,डाॅ.सुशील रहागंडाले, पुर्व जि.प.सदस्य मनोज डोंगरे, कैलास पटले, सुनिता मडावी, विणा बिसेन, हरिणखेडे,काचेवानी सरपंच मंडारी, कवलेवाडा ग्राम पंचायत सरपंच किरण पारधी, चिरेखानी सरपंच सोनु पारधी, पुर्व पंचायत समिती सभापती निता रंहागडाले, मनोहर राउत, नत्थु अंबुले, मायाताई शरणागत , जया धावडे, डाॅ.किशोर पारधी,किरण बंसोड, देवेन्द्र चैधरी, संभाजी ठाकरे,शोभेलाल दहीकर,डाॅ.विठ्ठल पारधी, गजानन बारापात्रे, जितेन्द्र पटले,आषु पटले, भवानीसिंग बैस, रामसागर धावडे, राजेश श्रीराम,तुंडीलाल शरणागत , रवि पटले, विजय बुराडे, बालु बावनथडे, प्रा.राजेन्द्र पटले, थानसिंग हरिणखेडे, डाॅ.मुकेश पारधी, सुखदेव बिसेन,गायत्री साबळे, जितेन्द्र पारधी,वाशीम शेख , राहुल गहेरवार,राजु ठाकरे, विषेश छुगानी आदि प्रमुख कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.आभार माजी उपसभापती डाॅ. किशोर पारधी यांनी मानले.