डिजीटल सातबाऱ्याची अट शिथिल करून धानखरेदी सुरु करा-आमदार रहांगडाले

0
229

तिरोडा- गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धान कापून धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत परवानगी दिली असून यामध्ये डिजीटल सात बारावर खसरा नोंद, जातीची नोंद,संयुक्त खातेदारकास हमीपत्र, मावा तुडतुडा ची नोंद ची अट एवढ्या अटी व शर्ती घातल्या असून जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये डिजीटल सात बारा झालेले नसून रोवणीचे क्षेत्र व उत्पनाची नोंद नसल्याने आधारभूत धान खरेदी सुरु झालेले नाही व शेतकऱ्यांना आपले धान खुल्या बाजारात पडक्या दरात विक्री करावे लागत आहे. तसेच यावर्षी ऐन कापणीच्या वेळी मावा तुडतुडा लागला असून त्याचे सर्वेसुद्धा संथगतीने होत आहे याकरिता सरासरी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व आधार भूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता अटीमध्ये शिथिलता देऊन हस्तलिखित सात बारे ग्राह्य धरून आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी पत्राद्वारे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे.