नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

0
76

पाटणा=बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला बहुमत मिळाले असा दावा भाजपने केला आहे. यासह सातव्यांदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये फखऊ हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. २00५ मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र २000च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले. त्यानंतर २00५ मध्ये नितीश कुमार हे भाजप आणि जेडीयूच्या व्यापक निवडणूक प्रचाराचा चेहरा बनले. राष्ट्रीय जनता दलाच्या दीर्घ राजवटीने निर्माण झालेल्या रागाचा नितीश यांना थेट फायदा झाला आणि २४ नोव्हेंबर २00५ रोजी पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यावेळी त्यांचे सरकार पाच वर्षे चालले. २0१0च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-जेडीयू युतीवर राज्यातील जनतेने विश्‍वास व्यक्त केला. यानंतर २६ नोव्हेंबर २0१0 रोजी नितीश यांनी तिसर्‍यांदा शपथ घेतली. २0१४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाईट पराभवानंतर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. हा त्यांचा नैतिक निर्णय मानला गेला. ते आपल्या जुन्या साखी भाजपपासून विभक्त झाले होते आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली होती. नितीश यांनी जीतनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले.