व्यहाड खुर्द येथे धान खरेदी केंद्र शुभारंभ

0
65

उपरी (प्रतिनिधी) :-केंद्र शासनाच्या खरीप २०२०-२१ या वर्षीच्या उत्पादीत शेतमालाची कीमान आधारभुत कींमती आधारीत खरेदीच्या अधीन सावली तालुक्यात सध्या चार खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांपैकी व्याहड खुर्द विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आज मंगवारला संस्थेचे अध्यक्ष दिपक जवादे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आले. शासनाने आधारभुत कींमती पेक्षा कमी दराने धान खरेदी करण्यात येवु नये असा शासन निर्णय असला तरी बोनसची घोषना शासनाने केली नाही.सदर केंद्रात खरीप कालावधी १ आक्टोंबर् २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत अ, दर्जा असलेल्या धानाची १८८८ रू, तर साधारण धानाची कीमत १८६८ रू, प्रती क्वींटल या कींमतीत शेतक-यांना आपले धान विक्री करता येणे शक्य आहे.
मात्र धान विक्रीस आणतांना धान साफ करून आणावे, धानात १७ टक्के पेक्षा जास्त (आद्रता) ओलावा नसावा,
धान आणण्या पुर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ऑनलाईन नोंदणी करून टोकण प्राप्त करून घ्यावे व मगच खरेदी केंद्रावर धान घेऊन जावेअसे आवाहन संस्थेच्या वतीने शेतक-यांना करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिपक जवादे, उपाध्यक्ष हरी ठाकरे, संचालक केशव भरडकर, मारोती बाबनवाडे, पुंडलिक मडावी, विनोद बांबोळे, सुनील करकाडे, फकिरा कावळे, उमाकांत खेकडे, श्रीमती मंदाबाई मशाखेत्री व कृषी मित्र भास्कर मस्के , कर्मचारी विनोद चल्लावार सचिव, योगा मानकर, योगेश गोहणे, व मंगेश बोबाटे इत्यादी उपस्थित होते.