‘कोरोना’वर रामबाण समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरवर WHO ने आणली स्थगिती

0
423

नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या उपचारांमध्ये आशेचा किरण म्हणून रेमडेसिवीर या औषधाकडे पाहिले जात होते. पण कोरोनाच्या रुग्णांवर आता हे औषध फारसे प्रभावी ठरत नसल्याचे समोर आले आहे. Gilead Sciences च्या या औषधाबाबत आक्षेप घेत हे औषध न वापरण्याचा सल्ला खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) दिला आहे.

The BMJ या वैद्यकीय नियतकालिकाला जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने सांगितले आहे की, रुग्णांवर रेमडेसिविर हे औषध कोणत्या प्रकारची सुधारणा करते याचे काहीही पुरावे सापडलेले नाहीत. डब्ल्यूएचओच्या ग्लोबल ट्रायलचे रिझल्ट समोर आल्यानंतर तज्ञ समितीने या शिफारशी जारी केल्या आहेत. सॉलिडॅरिटी ट्रायल असे या ट्रायलला म्हटले जाते. रेमडेसिविर औषध मृत्यूचे आकडे कमी करण्यामध्येही अयशस्वी ठरल्याचे सॉलिडॅरिटी ट्रायलच्या निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे. तीन इतर ट्रायलच्या आकड्यांचीसुद्धा तज्ञ समितीने समीक्षा केली आहे. समिती म्हणाली की, या औषधाचा रुग्णांवर काही खास प्रभाव दिसून आलेला नाही.

दरम्यान, हे औषध उपयुक्त असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थद्वारे केलेल्या ट्रायलमध्ये सांगण्यात आले होते. इंस्टिट्युटच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात दाखल रुग्णाच्या रिकव्हरीचा कालावधी पाच दिवसांपर्यंत रेमडेसिवीर औषधाचा वापर कमी करू शकते. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने इन्स्टिट्युटच्या या दाव्यानंतर औषधांना मंजुरी दिली होती. डब्ल्यूएचओने रेमडेसिवीर औषधावर केलेले विधान गिलियड सायन्ससाठी एक मोठा धक्का आहे.

डब्ल्यूएचओच्या ट्रायलवर गिलियड सायन्सने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आतापर्यंत महत्त्वपूर्ण डेटा एजन्सीने जारी केलेला नसल्यामूळे याला अंतरिम परिणामांची विश्वसनियतेचे मूल्यांकन करता येणार आहे. त्यांनी याबाबत एक पत्रक जारी करत म्हणाले की, विषाणूविरोधात रेमडेसिवीर औषध काम करते आणि रुग्णांचा रिकव्हरी टाइम कमी करते. तसेच जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आणि अ‍ॅटिव्हायरल उपचारांमध्ये रेमडेसिवीरच्या वापरावर डॉक्टर सर्वप्रथम विश्वास ठेवत आहेत. डब्ल्यूएलचओचे दिशानिर्देश अशा परिस्थितीत या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या जगभरातील सुमारे 50 देशांतील कोविड-19 च्या रुग्णांना है औषध दिले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा ऑक्टोबर महिन्यात कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर हेच औषध देण्यात आले होते. पण डब्ल्यूएचओच्या तज्ञ समितीने सांगितले की, त्यांच्या निष्कर्षांचा असा अर्थ होत नाही की रेमडेसिवीर औषध हे निरुपयोगी आहे. पण सद्यस्थितीत उपलब्ध आकड्यांच्या आधारावर कोरोनाच्या रुग्णांच्या प्रकृतीत या औषधामुळे कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे पुरावे नाहीत.(साभार माझापेपर)