चारुलता टोकस महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष

0
7

नवी दिल्ली दि.७: वर्धेच्या चारुलता टोकस यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. दिवंगत ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या चारुलता यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. टोकस यांच्याशिवाय सुशीला नेगी यांना हिमाचल प्रदेश, सुब्रत दत्ता यांना पश्‍चिम बंगाल तसेच बरखा शुक्ला यांना दिल्ली महिला कांग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. आजच महिला काँग्रेसच्या ११ महासचिवांची आणि नऊ सचिवांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डॉ. शोभना शाह तसेच वर्षा गायकवाड यांच्यासह ११ जणींना सरचिटणीस बनविले आहे.
सुनीता सहरावत आणि तलत अझीज यांचा नऊ सरचिटणीसांमध्ये समावेश आहे.सुशीला अली यांच्याकडे आयटी विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.