प्रफुल्ल पटेल दोन दिवस प्रचारात

0
13

गोंदिया दि.२५: जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची सांगता होताच गोरेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या चारही नगर पंचायतींमध्ये निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. ग्रामपंचायत विसजिर्त होऊन पहिल्यांदाच नगर पंचायतींची निवडणूक होत असल्याने अनेक जण आपले नशिब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रत्येकी १७ सदस्यांच्या चारही नगर पंचायतीत एकूण ६८ जागांसाठी ३४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शुक्रवारपासून प्रचाराने वेग घेतला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल चारही नगर पंचायतीत दि.२७ व २८ ला प्रचारसभा घेणार आहेत. दि.२७ ला ३.३0 वाजता अर्जुनी मोरगाव, संध्याकाळी ६ वाजता देवरी आणि दि.८ ला सडक अर्जुनी येथे तर दि.२८ ला दुपारी १२ वाजता गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.