पूल डिजाईंनिगवर एमआयटीत कार्यशाळा

0
4

गोंदिया,दि.24-येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिक महाविद्यालय व टेक्नालाॅजी संस्थेच्या सिव्हील शाखेत पूल तयार करण्याच्या डिझायनींगच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच पार पडले.मुंबई येथील के.ए.आर.के.टेक्नोसोल्युशन चे ट्रेनर अभिनय गुप्ता यांनी पुल तयार करण्याविषयी तसेच पुलाचे डिझाईन तयार करतांना येणार्या अडचणीची माहिती दिली.संगणक तज्ञांच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली.या कार्यशाळेला 52 विद्यार्थी हजर होते.14 गटात विभागणी करुन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पूल तयार करण्याचे डिझाईन तयार करवून घेण्यात आले.येथील उत्कृष्ट दोन गटाची निवड चेन्नई आय.आय.टी येथे आयोजित इंडियाज बिगेस्ट सिव्हील स्पर्धा 2016 करीता निवड करण्यात आली.यामध्ये निखील कटरे,मृदुल कौशीक,राहुल कुमार,राकेश मेश्राम,मोहित मिश्रा,हेमंत शहारे,शशीकांत बोरकर व हितेश भारती या विद्यार्थांचा समावेश आहे. प्रार्चाय डाॅ.एस.एस.राठोड,सिव्हील प्रमुख डाॅ.सुरेंद्र असाटी,प्रा.बी.पी.शेंडे,प्रा.कैलाश निकुसे,प्रा.विजय बांगडे,कार्यशाळा सयोंजक निखील कटरे,दुगेर्श कटरे,ओवेश सोलकी यांनी सहर्काय केले.