भाजप प्रदेश महिला आघाडीच्या चिटणीसपदी सीता रहागंडाले

0
12

मुंबई,दि.२८-भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा एड.माधवीताई नाईक यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाची कार्यकरिणी घोषित केली. कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, सहा चिटणीस व एक कार्यालय मंत्री यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत गोंदियाच्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीता रहागंडाले यांना चिटणीसपदावर बढती देण्यात आली आहे.भाजप प्रदेश उपाध्यक्ष व खासदार नाना पटोले,तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले,जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल आदींसह इतर नेत्यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारीणीत श्रीमती रहागंडाले यांना स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.