पक्षाची भिस्त ही सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावरच- आमदार सहसराम कोरोटे

0
45

देवरी येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात

देवरी,दि.23- राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडताच कोरोनाची साथ आली. सर्व गतिचक्रे थांबली. राज्य सरकारचे महसूल सुद्धा बुडाले. कोणाला कोणाशी भेटता येत नव्हते. अशा कठीण समयी सुद्धा मी आपल्या मतदार संघात कार्यरत होतो. विकास कार्ये ही कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणावर करता आली नाही. तरी जमेल ती मदत मतदार संघात केली. मात्र, हे कार्ये जनतेपर्यंत पोहचविणे आता सामान्य कार्यकर्त्यांचा हातात आहे. अगदी सामान्य कार्यकर्त्याने ही जाबाबदारी पेलणे आवश्यक आहे कारण शेवटी पक्षाची भिस्त ही कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच असते, असे प्रतिपादन देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी  आज(दि.23) रोजी देवरी येथे केले.

ते सीताराम लॉन्स मध्ये तालुका कॉग्रेस शाखेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर माजी जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, घासीलाल कटकवार, रत्नदीप दहिवले, माजी जिप सदस्य उषा शहारे, राधेश्याम बगडीया,गणेश भेलावे, दिलीप श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कोरोटे म्हणाले की केंद्रातील सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. वाढत्या माहागाईने सर्वसामान्याांचे कंबरडे मोडले आहे. धुराचा त्रास होतो असे सांगून सत्ता बळकावणारे आता घरघुती गॅसच्या किमती वाढवून महिलांचे जीणे दुभर करत आहे. रोजगार देण तर दूरच राहिले पण आहे ते रोगजार सुद्धा काढून घेतले.एकही प्रकल्प उभा केला नाही. परंतु, कॉंग्रेसने उभे केलेले प्रकल्प आता हे सरकार श्रीमंताच्या झोळीत कवडीमोल पद्धतीने टाकत आहे. असे असताना भाजपची नेतेमंडळी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत खोट्या गोष्टी रेटून सांगायला मात्र मागेपुढे पाहत नाही. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांची ही खेळी रोखली पाहिजे. केद्राचे अपयश आणि आपली कार्ये हे दोन्ही जनतेपुढे नेऊ शकलो तर पक्षाला पुन्हा गतवैैभव प्राप्त होईल. मी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी श्री दहिवले, कटकवार, कटरे यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप भाटीया यांनी तर संचालन अविनाश कटरे यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका युवा कॉग्रेसच अध्यक्ष शकील कुरैसी यांनी मानले. यावेळी तालु्क्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.