ईडीचा अध्यक्ष कोण,बदल्या कशा होतात ? ; सुप्रिया सुळें

0
95

नागपूर । देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करीत तुफान फटकेबाजी केली.मी माझ्या आयुष्यात सत्तेचा दबावतंत्र म्हणून वापर करताना पाहिलेले नाही.बसचे तिकिट वाटतो ना, तसं विरोधक बोलला की, पाठव ईडीची नोटीस,अशी परिस्थिती झालेली आहे,असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

 

नागपूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी नागपूर माध्यमांसोबत संवाद साधला.त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.मी माझ्या आयुष्यात सत्तेचा दबावतंत्र म्हणून वापर करताना पाहिलेले नाही.बसचे तिकिट वाटतो ना, तसं विरोधक बोलला की, पाठव ईडीची नोटीस,अशी परिस्थिती झालेली आहे,असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.ही परिस्थिती भारताच्या राजकारणासाठी तसेच समाजकारणाच्या हिताची नाही. अतिशय दुदैवी बाब आहे, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.भाजपाने हे नवीन कल्चर काढले आहे. पण आम्ही त्याच्याशीही लढू,असेही त्यांनी स्पष्ट केले.ईडीचा अध्यक्ष कोण? बदल्या कशा होतात ? ईडीचा एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर रेड टाकतो, असे कधी आम्ही पाहिलेले नाही.आमचा कधी संबंध आलेला नाही. केंद्र सरकारच्या कालावधीत ईडीचा अजब कारभार सुरू आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दलही भाष्य केले. कोणीही काही बोललं की थोडासा वेळ विचार करते.माझं आयुष्य ब्रेकींग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे.त्यामुळे इस्टंट कॉफीसारखं जीवन जगत नाही.त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नाही.राज्यातील सर्वच पक्षाचे लोक आपली विचारधारा, राजकारण सोडून चांगले संबंध ठेवत असतील तर मी मनापासून स्वागत करेन.यशवंतराव चव्हाण यांचे सर्व पक्षांसोबत चांगले संबंध होते.त्यांचेच संस्कार माझ्यावर असून,राजकीय मतभेद एकाठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.माझ्यावर जे संस्कार झालेत त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याचा वारसा आहे.त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते त्यामुळेच मी अशा भेटी होत असतील आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन भेटीगाठी होत असतील तर त्याचे स्वागतच करेन असे त्यांनी स्पष्ट केले.गेली अनेक महिन्यांपासून नागपूरमधील राष्ट्रवादी कार्यकारणीची बैठक झाली नव्हती,अनेकांच्या भेटी झाल्या नव्हत्या.त्यामुळेच दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यात सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षासंदर्भातील महत्वाचे निर्णय आणि कामे हातावेगळी करण्याचा विचार असल्याचे सुळे यांनी सांगितले.