विशालदादांच्या पाठीशी आमचे सदैव आशीर्वाद राहतील : मोहनराव कदम

0
17
वांगी-कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी आज दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी वांगी येथे भेट देऊन दर्शन घेतले. तसेच सोनहीरा सहकारी साखर कारखाना येथे कॉंग्रेसचे माजी सांगली जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
मोहनराव कदम यांनी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून विशालदादांचा सत्कार करून आशीर्वाद दिले. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. पक्ष वाढवा आम्ही तुमच्या बरोबर सोबत आहोत. असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्यवस्थपकीय संचालक शरद कदम, संचालक दिलीप सुर्यवंशी, बापूराव पाटील, निवृत्ती जगदाळे, जगन्नाथ माळी, कडेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राहुल पाटील, मोहिते वडगावचे सरपंच विजय मोहीते, धोंडीराम पाटील उपस्थित होते.