कोहका येथे कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

0
23

गोंदिया,दि.02ः- तालुक्यातील ग्राम पंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोहका येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये आज ०२ सप्टेंबरला कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.लसीकरण कार्यक्रम सरपंच अर्चनाताई कंसरे यांच्या अध्यक्षतेमध्ये राबविण्यात येत असून MPW जितेंद्र साव, ANM सरिता ठाकरे, आशा सेविका लिल्हारेबाई, पालियाबाई , चिखलोंढेबाई सहकार्य करीत आहेत.गावातील वयोवृध्दापासून ते युवकापर्यंत सर्वांनीच लसीकरणासाठी आग्रह धरल्याने शाळेत कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी ग्रा.प.सदस्य संतोष पटले, अनिता रहांगडाले, शाळेचे मुख्याध्यापक अग्रवालर,श्री.बिसेन, पाचे मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक लसीकरणासाठी जनजागृती करीत आहेत.