कातुर्ली गावातील अनेक युवा तरुणांचा मनसेत प्रवेश

0
24

 गोंदिया :-  येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक जिल्हाध्यक्ष मनीष  चौरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये ग्राम कातुर्ली गावांतील तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे पक्षात प्रवेश केला. या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, शहर उपाध्यक्ष अनिकेत सांडेकर, राणा सिंह नागपुरे, तसेच प्रवेश करणाऱ्यांमध्ये यश कोरे, शुभम चेतराम भेलावे, राकेश प्रेमलाल ब्राह्मणकर, विशाल कृष्णकुमार मेश्राम, विरेंद्र बिसेन, अजित राजकुमार बहेकार, रोशन राजू तरोणे, प्रदीप तरोणे, रंजिश शहारे, संदीप ठाकरे, दुर्गेश ठाकरे, मंगेश भांडारकर, राकेश भेलावे, प्रशांत राऊत , गौरव वानखेडे यांचा समावेश होता. बैठकीचे संचालन तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे व आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष रजत बागडे यांनी केले.