गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध आघाडी व सेलची बैठक संपन्न

0
34

गोंदिया– जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आघाडी व सेल जिल्हा अध्यक्ष,सर्व आघाडी व सेलचे तालुका अध्यक्ष यांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला गोंदिया जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्व अध्यक्षांना आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तांना पक्ष संघटनेत क्रियाशील करण्याच्या सुचना देण्यात आल्यात. तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व सेल व आघाडी च्या पक्ष संगठण स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बुथ कमिट्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी समन्वय साधून आगामी काळातील निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात यावा, राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून मा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात जिल्हात झालेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहचविण्याचा काम आपण करावे असे संबोधन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. या सोबतच पक्ष संघटन संबधी विषयांवर विविध चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, विशाल शेंडे, प्रभाकर दोनोडे, डी. यू. रहांगडाले, राकेश लंजे, प्रेमकुमार रहांगडाले, मनोज डोंगरे, घनश्याम मस्करे, गणेश बर्डे, किशोर पारधी, रफ़ीक खान, अब्दुल मतीन शेख, एफ. आर. टी. शाह,कल्पना बहेकार, सुशीला हलमारे, पारवता चांदेवार, रजनी गिरहपुंजे, छायाताई चौहान, मंजू डोंगरवार, नीता रहांगडाले, शैलेश वासनिक, सुनील पटले, आरजू मेश्राम, अरशद पठान, अरशद मिर्ज़ा, संजय रहांगडाले, थानसिंह हरिनखेड़े, श्रीराम मुनेश्वर, संतोष पुढ़कर, हेमंत शेंडे, रामेश्वर चौरागड़े, मुनेश्वर कावड़े, बाबा बहेकार, माइकल मेश्राम, रोहित बनोटे, अमर कुम्भरे, नितिन टेंभरे, प्रवीण बीजेवार, पंकज चौधरी, विक्रांत चौधरी, देवाजी बनकर, राजू गजभिये, योगेश कटरे, संतोष रहांगडाले, कैलाश पटले, बबलू खान, सतीश पारधी, अब्दुल यूनुस शेख, सचिन लोहिया, दर्पण वानखेड़े, मोनू शेख, गोविन्द लीचड़े, दिनेश कोरे, रविकुमार पटले, डॉ. प्रदीप रोकड़े, राजेश तुरकर, आशीष येरने, प्रमोद लांजेवार, सुभाष यावलकर, रतिराम राणे, रविंद्र मेश्राम,  प्रतापगडे, संतोष मेश्राम, सौरभ रोकड़े, एकनाथ वहीले, चंद्रकुमार चुटे, कीर्ति राणे, हिमांशु ताराम, स्वप्निल टेम्भुरकर, तीरथ येटरे, समीर खान, रोहन खान, अब्दुल सबील कुरैशी, सैय्यद इक़बाल अली, अंजू बिसेन, सुनीता मड़ावी, आर. के. जांभुळकर, वालदे, लव माटे, वीरेंद्र जीवनी, विक्की भाकरे, पिंटू कटरे, टी. के. कटरे, लोकचंद बिसेन, खोमेश शरणागत सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.