41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय काळीपिवळी, ऑटो चालक संघटनेचा शिवसेना प्रवेश

काळीपिवळी, ऑटो चालक संघटनेचा शिवसेना प्रवेश

0
37

blank

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील काळीपिवळी आणि ऑटो चालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका शिवसेना प्रमुख चेतन दहीकर यांच्या नेतृत्वात गुरुवार, 16 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश घेतला. तालुका शिवसेनेच्यावतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

तालुक्यात काळीपिवळी आणि ऑटो चालकांची मोठी संख्या आहे. ऑटो चालकांना कोरोना काळापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकीय बळ मिळावे, कुठल्या तरी मोठ्या संघटनेचा आधार मिळावा म्हणून तालुका काळीपिवळी आणि ऑटोचालक संघटनेने एकमताने निर्णय घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शहारे यांनी व्यक्त केले.

या वेळी संघटनेचे प्रमोद पाल, निकेश झोडे, राजू शाहारे, संजय आंबेडारे, विकास बर्वे आणि सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज स्थानिक तालुका शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख चेतन दहिकर, जिल्हा सचिव संजय पवार, माजी बाजार समिती संचालक यादोराव कुंभरे, माजी नगरसेवक प्रकाश उईके, सुशील गहाणे, बबन बडवाईक, राजेश कापगते, महेश शाहारे उपस्थित होते. भगवा दुपट्टा घालून सर्वांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

blank