पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनी गोंदियात रक्तदान

0
20

गोंदिया,दि.18 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी स्थानिक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या गोंदिया तालुका शाखा, शहर शाखा आणि भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने आयोजित या शिबिराला गोंदिया ज़िल्हाध्यक्ष केशवराम मानकर, माजी आमदार गोपालदास अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिबिरात पक्ष कार्यकर्ते आणि युवा वर्गाने मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून श्री मोदी यांना वाढदिवासात्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्ह्याध्यक्ष भावना कदम, तालुकाध्यक्ष माधुरी हरिनखेड़े, शहराध्यक्ष निर्मला मिश्रा, जिल्हा सचिव योगराज रहांगडाले, तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे, शहराध्यक्ष सुनील केलनका, महामंत्री मनोज मेंढे, देवचंद नागपूरे, अर्जुन नागपूरे, शंभु ठाकुर, युगलकिशोर ठाकरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री कुणाल बिसेन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तिजेश गौतम, गुड्डू चांदवानी, अभिषेक श्रीवास्तव, ललित बिसेन, जागेश्वर नागपूरे,  शरद नागपूरे व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.