41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता ओव्हरलोड ट्रक रेल्वे फाटकाला धडकला,जीवित हानी टळली

ओव्हरलोड ट्रक रेल्वे फाटकाला धडकला,जीवित हानी टळली

0
67

blank

अर्जुनी मोरगाव (दि.18)- ओव्हरलोड ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटून गणेश नगर येथील रेल्वे फाटकावर ट्रकने धडक दिल्याची घटना शुक्रवार च्या मध्यरात्री दोन वाजता दरम्यान घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, राजनांदगाव वरून हैदराबाद ला जाणाऱ्या मालवाहक ट्रक चालकाचा गणेश नगर येथील रेल्वे फाटका जवळ वाहनावरील ताबा सुटून ट्रक दुर्घटनाग्रस्त झाला. हेद्राबादला जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक सी.जी.08 एजे 9957 ने रेल्वे फाटकाच्या सुरक्षा कुंपणाला धडक दिली. सदर दुर्घटनेत रेल्वेच्या मालमत्तेसह ट्रक चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.