सोलापूर मनपात ‘बसप’चा महापौर येणार- अँड.संदीप ताजने

0
21

 मुंबई,दि.19 – सर्वसमावेशक, सर्वजन हितकारक विकासासाठी सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल. फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेने पावन आणि पुरोगामी झालेल्या महाराष्ट्राला जातीचे नाही, तर ‘नीती’चे राज्य बनवण्याचे काम केवळ बसपाच करू शकते, असे प्रतिपादन बसपचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी काल (दि.18) सोलापूर येथे केले.

ते बसपच्या संबाद यात्रेदरम्यान सोलापूर येथे काल शनिवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना अॅड ताजने यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत यामुळे यंदा बसपाचे ४० नगरसेवक निवडून येतील, असा दावा सुदधा ठोकला. यावेळी त्यांनी  उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. महाविकास आघाडीच्या काळात  होणाऱ्या भोंगळ कारभारावरही  टीकास्त्र सोडण्याचे श्री ताजणे विसरले नाही.
कार्यक्रमात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी अशोक अगवणे, बलभीम कांबळे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद बनसोड, हुलगेश चलवादी, काळूराम चौधरी ,शहर अध्यक्ष देवा भाई उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.प्रेमनाथ सोनावणे, कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव योगेश गायकवाड, शहर सचिव मिझा शेख, प्रविण कांबळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.