महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची भाजपची ताकद नाही-विजय वड्डेटीवार

0
12

गोंदिया- राज्यात व केंद्रात सत्तेत येण्यासाठी लोकांना खोटे आश्वासन देणारे राज्यातील भाजपचे सरकार असैवधानिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चानुसार शेतीमालाला भाव देण्याची केलेली घोषणा हवेतच विरली.तर सत्तेवर येताच महाराष्ट्र टोलमुक्त करु अशी घोषणा करणार्या भाजपला सत्तेवर बसल्यानंतरही टोलमुक्ती करता आली नाही.महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची औकातच(ताकद)भारतीय जनता पक्षात नसल्याचा घणाघणाघाती आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.ते गोंदिया येथे काँग्रेसच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित सरकारविरोधी मोच्यार्च्या तयारीसंदभार्त काँग्रेसच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची भाषा वापरणारे भाजप नेते देवेंद्र ङ्कडणवीस,नितीन गडकरी व सुधीर मुनगंटीवार आज राज्यात व केंद्रात सत्तेत असून मंत्री आहेत.परंतु सत्तेत बसतात यांच्या भाषेत बदल झाले अाहे एवढेच नव्हे तर तीघांच्याही मतामध्ये अंतर पडल्याचे वड्डेटीवार म्हणाले.शेतकरी हिताचे आव आणून काँग्रेसला हिणवणारे महसुल मंत्री एकनाथ खडसे हेच शेतकर्याची टिंगलटवाळी करीत अाहेत.अशा सरकारच्या विऱोधात काँग्रेस भक्कमपण विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने दिलेल्या आश्वासनाला येथील मतदार बळी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले.