37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणातायेत महाज्योती रोजगार देणारी संस्था

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणातायेत महाज्योती रोजगार देणारी संस्था

0
145

blank

गोंदिया,दि.13ः भाजपच्या काळात ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली आणि महाविकास आघाडीच्या काळात ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या सोयी देण्यासाठी महाज्योती ही संस्था 2019 मध्ये अस्तित्वात आली.अस्तित्वात येऊन या संस्थेला दोन वर्षाचा काळ लोटला असला तरी बहुसंख्य ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात ही संस्था अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.त्यातच गेल्या दोनवर्षापासून पीएचडीधारकांना विद्यावेतन न देऊ शकणारी ही महाज्योती संस्था ओबीसी मंत्री वड्डेटीवारांच्या मतदारसंघात करडई तेल प्रकल्प उभारायला निघाली आहे.यावर काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष असलेले आणि स्वतःला ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे नाना पटोले यांनी मात्र विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनापेक्षा त्या प्रकल्पाला महत्व देत महाज्योती ही संस्थाच रोजगार देणारी असल्याचे वक्तव्य आज गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारानंतर माध्यमांशी बोलतांना केले.यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या पक्षाच्या मंत्र्याची पाठराखण करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.पटोलेंनी वास्तविकतेकडे दुर्लक्षकरीत यास राजकीय रुप देत विरोधी लोक महाज्योती व मंत्र्यांबद्दल भ्रामक प्रचार करीत असल्याचे जाहीर वक्तव्य करुन ओबीसीं विद्यार्थ्यांच्या योजना न राबविता मंत्र्याच्या मतदारसंघात उभारला जात असलेल्या करडई प्रकल्पाला रोजगाराचे साधन ग्राह्य धरुन मान्यता दिल्याने ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नापेक्षा ओबीसी बहुजन मंत्र्याच्या मतदारसंघातील करडई प्रकल्प महत्वाचा असल्याचे पटोलेंनी सांगत मंत्री वड्डेटीवारांच्या चुकांवर पाघंरुन घालण्याचेच काम एकप्रकारे केल्याचे दिसून येत आहे.

blank