33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय कोल्हापूरात आता पर्यंतच्या निकालात काॅग्रेस आघाडीवर

कोल्हापूरात आता पर्यंतच्या निकालात काॅग्रेस आघाडीवर

0
22

blank

👉👉काॅग्रेसच्या जयश्री जाधव यांना आता पर्यत 27 हजार 380 मते

👉👉भाजप पिच्छाडीवर

👉👉भाजपचे सत्यजित कदम यांना 18 हजार 905 मते

👉👉सातव्या फेरीची मतमोजणी सुरू

कोल्हापूर:- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणीला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. महाविकासआघाडीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

👉या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी 61.19 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 उमेदवार आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार आज कोणाला कौल देणार याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

👉कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 पुरुष व 1 लाख 46 हजार 068 महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी 12 व सैन्यदलात 95 इतके मतदार आहेत. या मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापैकी 64.49% पुरुषांनी तर एकूण महिलांच्या मतदानापैकी 57.89 टक्के महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.