संपर्कमंत्री ना. तनपुरे यांच्या उपस्थितीत जनता दरबार

0
24

चंद्रपूर- जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या चंद्रपूर दौर्‍यानिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड यांनी चंद्रपूर येथील शासकीय विर्शामगृह येथे चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबारमध्ये महानगरपालिका आयुक्त महावितरणचे अधिकारी चंद्रपूरचे तहसीलदार तसेच अन्य अधिकारी यांच्यासमवेत नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न तनपुरे यांनी केले. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन राजूरकर यांनी वन विभागासंदर्भात बिगर आदिवासी शेतकर्‍यांना वन पट्टे देण्यात यावे तसेच ज्यांचे प्रलंबित दावे आहेत त्यांच्या जमीनी खाली करण्यासाठी वारंवार येत आहे त्या शेतकर्‍यांना वारंवार त्रास देऊ नये असे आदेश मंत्री मोहदय यांनी जिल्हाधिकारी व वन अधिकार्‍यांना दिले तसेच ज्या आदिवासींना वन पट्टे मंजूर केले आहे त्या वन पट्टे धारकांना मोजणीचे रक्कम आदिवासी विभागाने भरून मोजणी करून द्यावी असे सुद्धा आदिवासी विभागाला सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ओबीसी जिल्हाध्यक्ष अरीकर, ज्येष्ठ नेते बोरकुटे, प्रदेश सचिव मुनाज भाई, शेख शहर महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, अभिनव देशपांडे, दीपक जयस्वाल, मंगला अखरे उपस्थित होते.