सत्तेची मास्टर चावी हातात घ्या-खासदार वीरसिंह

0
7

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार सत्तेची मास्टर चावी जोपर्यंत आपल्या हातात येणार नाही, तोपर्यंत आपल्या समस्या सुटू शकणार नाही, त्यामुळे सत्तेची मास्टर चावी हातात घ्या, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंह यांनी येथे केले.

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरा मैदान येथे आयोजित जनकल्याणकारी दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कृष्णा बेले, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, प्रदेश महासचिव जितेन्द्र म्हैसकर, प्रदेश मीडिया प्रभारी सागर डबरासे, प्रदेश सचिव उत्तम शेवड़े विवेक हाडके, पृथ्वी शेंडे, नरेश वासनिक, रुपेश बागेश्वर आदी प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

खा. वीरसिंह म्हणाले, उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बसपाने ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत बसपालाच बहुमत मिळेल, अशी परिस्थिती आहे. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार यानी आभार मानले.

यावेळी गौतम पाटील महेश सहारे कविता लांडगे,संजय जैस्वाल अविनाश बडगे आनंद सोमकुवर जीतेन्द्र घोडेस्वार अभिषेक शंभरकर यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.