पटेल महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

0
17

भंडारा : स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कार्तिक पनीकर होते. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राहुल मानकर, प्रा. शैलेश वसानी, डॉ.आनंद मुळे, सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते आदी मान्यवर उपस्थित होते. ‘भारतातील राज्यकर्त्यांनी संविधानाची अंमलबजावणी योग्यरीत्या पार पाडली आहे किंवा नाही’. हा स्पर्धेचा विषय होता. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्ष उत्साहपूर्वक, प्रभावी व परिणामकारकरित्या साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या संबंधाने केंद्रीय राष्ट्रीय समितीने सर्व विद्यापीठात व कुलगुरूंनी महाविद्यालय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जे. एम. पटेल महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विषयाच्या बाजूने आणि विषयाच्या विरूद्ध बाजूने अशा दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांनी त्यांची मते मांडली.

विषयाच्या विरूद्ध बाजूने बहुतांश विद्यार्थ्यांनी मते मांडली. या स्पर्धेत डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ.उमेश बन्सोड, प्रा. अनिता जयस्वाल यांनी परीक्षकाची भुमिका पार पाडली. स्पर्धेत शरद कोदाने आणि शुभम वनवे हे विद्यार्थी विजेते ठरले.

वादविवाद स्पर्धेचे संचालन प्रा.प्रशांत वाल्देव यांनी तर आभार प्रा. प्रशांत गायधने यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.अनिल भांडारकर, प्रा.ममता राऊत, प्रा.यशपाल राठोड, डॉ. अपर्णा यादव, डॉ. उज्वला वंजारी, डॉ. निशा पडोळे, प्रा. विशाखा वाघ, प्रा. धनराज घुबडे, प्रा. तृप्ती राठोड, प्रा. नंदिनी मेंढे, प्रा. शितल महाजन, मनोहर पोटफोडे, विनोद नक्षुलवार आदींनी सहकार्य केले.