भाजप ब्राम्हणांचाच, हिंदुत्वही शत प्रतिशत ब्राह्मणीच-काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर

0
23
अमरावती दि.४- भाजपा निव्वळ आणि निखळ ब्राम्हणी पक्ष असल्याचा  पुरावा जिल्हा भाजपाध्यक्ष निवेदीता  दिघडे यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षातील ब्राह्मण पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीने मिळाला आहे. ब्राह्मण पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीमुळे भाजपातील बहुजनांनी आता  सावध व्हावे, असा सल्ला  प्रदेश काँग्रेस प्रवक्ता ॲड. दिलीप एडतकर यांनी दिला आहे. बहुजनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बहुजनांचीच शिकार  करणाऱ्या भाजपला आता तरी भाजपातील बहुजन कार्यकर्त्यांनी ओळखावे. भाजप हा केवळ बहुजनांचा वापर करणारा पक्ष आहे. भाजपचे हिंदुत्वही असेच ब्राह्मणी वर्चस्व लादणारे आहे. सनातन विचारांशी बांधील भाजपा बहुजनांचा कधीच होऊ शकत नाही,असे दिलीप एडतकर  यांनी म्हटले आहे
                      ब्राह्मण पदाधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन भाजपच्या  ब्राह्मण पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्हा भाजपाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्याविरुद्ध तथाकथित धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. भाजपात ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असून ब्राह्मणेत्तरांना घरगड्याची वागणूक मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते. आता कोणत्याही क्षणी कोणत्याही बहुजन कार्यकर्त्यांवर ब्राम्हण  पदाधिकाऱ्यांतर्फे धार्मिक भावना दुखावल्याचे गुन्हे दाखल होणारच नाहीत, याची शाश्वती नाही. म्हणून भाजपातील बहुजनांनी आता वेळीच सावध व्हावे; अन्यथा त्यांची खैर नाही, असाच संदेश निवेदिता दिघडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून व दाखल झालेल्या गुन्ह्यावरून देण्यात आलेला आहे, असे ॲड. दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
             राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात चेकाकाळलेल्या ब्राह्मण समुदायाने माजवलेला अनावश्यक गदारोळ, त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे दैवत मराठी मनाचा हुंकार शिवरायांच्या संदर्भात  टिळक आणि  पुरंदरे  यांचे महात्म्य वाढवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्नाची गंभीर दखल बहुजनांनी घेण्याची गरज असल्याचे ॲड. दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. शिवरायांच्या समाधीच्या संदर्भात महात्मा जोतीराव फुले यांच्या योगदानाला सोयीस्कर फाटा देत शिवरायांच्या समाधी जिर्णोद्धारासाठी  निधी जमा करून बुडीत बँकेत ठेवणाऱ्या  टिळकांचा समाधी जीर्णोद्वारात कवडीचाही सहभाग नसतांना त्यांना फुकटचे श्रेय देण्याचा प्रयत्न आणि शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंची पाठराखण ही सर्व उदाहरणं ब्राह्मणी वर्चस्वाचा अतिरेक आहे. बहुजनांच्या आदर्शांचा अवमान आणि  बहुजन समुदायाला हीन लेखण्याची प्रवृत्ती असून एकूणच जातीजातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ॲड.दिलीप एडतकर यांनी केला आहे.