राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी आमदार विद्या चव्हाण

0
24

मुंबई,दि.05ः-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान यांनी हि नियुक्ती केली आहे.सोबतच 9 विभागीय अध्यक्षांच्याही नियुक्त्या केल्या.यामध्ये नागपूर विभागीय अध्यक्षपदी गडचिरोली येथील श्रीमती शाहीन हकीम यांची निवड़ करण्यात आली. अमरावती विभागीय अध्यक्षपदी यवतमाळच्या वर्षी निकम,मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्रीमती शाजिया जमीर शेख(जालना),वैशाली माटे उस्मानाबाद, पश्चिम महाराष्ट्र विभाग सातारा येथील कविता म्हेत्रे व पुणे येथील वैशाली नागवडे,कोकण विभाग अध्यक्षपदी सिंधुदुर्गच्या अर्चना घारे,ठाणे विभागीय अध्यक्ष ऋता आव्हाड आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नंदुरबारच्या कविता परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. खासदार फौजिया खान यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील व्यापक अनुभवातून त्या या पदाला पूर्ण न्याय देऊन महिला संघटना अधिक बळकट करतील हा विश्वास व्यक्त करतील असे म्हटले आहे.