बांधकाम मार्गावरील खड्डेमुळे ब्रेझ्झा कार चालकाचा मृत्यू

0
250

आमगाव गोंदिया मार्गावरील महाकाली पेट्रोल पंप समोरील घटना
आमगाव :- सध्या गोंदिया जिल्हात नवीन राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे.आणि अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण स्थितीत असल्याने आमगाव गोंदिया मार्गावरवरून नागपूरकडे जात असताना आमगाव किडंगीपार नाल्या जवलळील महाकाली पेट्रोल पंप समोर वाहन आज 5 मे रात्री बारा वाजे दरम्यान क्रमांक MH.49 R.5595 ने वाहन क्रमांक एन. L.02 L.3631 सोबत अचानक ब्रेक मारल्याने टक्कर होऊन अपघात झाला.या अपघातात मारुती सुझुकी ब्रेझ्झा चालक साकेत गेंदलाल वानखेडे यांचा वय ३४ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. साकेत हा लांजी मध्यप्रदेश येथे तहसील कार्यालयात कार्यरत असून काही कामानिमित्त तो आपल्या नागपूर येथील घरी जात असताना हा अपघात झाला . मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास आमगाव पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू गजपुरे करीत आहेत.