भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदावर चामेश्वर गहाणे यांची निवड

0
29

अर्जुनी-मोर – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश चिटणीस पदावर अर्जुनी-मोर तालुक्यातील सिरेगावबांध येथील चामेश्वर गहाणे यांची नियुक्ती भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केली आहे. ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांकडून चामेश्वर गहाणे अभिनंदन होत आहे.