आंबेडकरी अस्मिता मिटवू पहाल तर स्वतःचे अस्तित्व गमवावे लागेल. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

0
12

मुंबई दि.8 (प्रतिनिधी) आंबेडकरी अस्मिता आणी धार्मिक विहारे संपवू पहात् असाल तर् स्वतःचे अस्तित्व गमवावे लागेल असा ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी विद्यामान् आमदार रमेश लटके यांना दिला.

विद्रोही पत्रकार पॅन्थर माकणीकर पुढे म्हणाले की, जाती-जातीत तेढ निर्माण करणे वा बौद्ध आंबेडकरी अस्मिता बौद्ध विहारे तोडणे असे करून आंबेडकरी समाजाला अस्मिताहीन करायचे दिवास्वप्न पाह्त् असाल तर हा मनसुबा पूर्ण होणार नाही. आंबेडकरी समाज पार्टी संघटनांच्या गटात विखूरला असला तरी शेवटी तो एकच आहे याचा विसर पडू देऊ नका.

आंबेडकर बौद्ध व पीडित समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर यांनी उजाळा देतांना म्हटले की, मोरारजी नगर येथील आनंद बुद्ध विहार मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाडण्याचे जे कृत्य केले ते निषेधार्ह आहे, स्थानिक आंबेडकरी कार्यकर्ते व आदरणीय पूज्य भन्ते शिलबोधी यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले, मात्र: मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आंबेडकरी 40 कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस लावल्या आहेत त्या मागे घ्या.

बुद्ध विहार बांधून देतो असे आश्वासित करूनही ते न बांधून देता सरळ बुलडोजर लावण्याचे कपट बौद्ध आंबेडकरी समाज् कधी विसरणार नाही. स्थानिक नगरसेवक पण यास अपवाद नाही. परंतु आंबेडकरी मतांवर निवडून येऊन त्यांच्याच अस्मिता संपवणे योग्य नव्हे असाही सल्ला डॉ. माकणीकर यांनी दिला.

ऑफिस मध्ये आंबेडकरी कार्यकर्ते भेटायला आले की CC TV कॅमेऱ्यात पाहून पाठीमागील दरवाज्याने बाहेर जावू नका. “साहेब नाहीत, बाहेर गेलेत.” अस उत्तर कर्मचाऱ्यांना दयायला सांगू नका. तुम्ही संविधानिक पदावर आहात असा जातीवाद केलात तर भविष्य अंधकारमय होईल.
विकास कामाकडे लक्ष द्या. पेवर ब्लॉक बसवणे म्हणे विकास नव्हे असाही टोला विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी लगावला.