जैन कलार समाज गोंदियाची सभा संपन्न.

0
35

गोंदिया-जैन कलार समाज गोंदियाच्या मुख्य कार्यकारिणी, युवा समिती व महिला समिती ची संयुक्त बैठक ७ में रोजी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुखराम खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विविध समाजोपयोगी विषयावर चर्चा करण्यात आली. त्या मध्ये ३० लाखाच्या तयार झालेल्या सभा मंडपाचे व दानशूर समाज बांधवांनी बांधून दिलेल्या खोली चे लोकार्पण, दानशूर समाज बांधवांचे सत्कार, लग्न समारंभ करीता थ्री फेस कनेक्शन घेणे, भवन परिसरात मंजूर झालेला शेड लावणे, समाज बांधवांकडून बांधकाम निधी व वार्षिक वर्गणी जमा करण्यासाठी अभियान चालविणे, ३० में ला चोरखमारा येथे पुढील सभेचे आयोजन करणे, लोकार्पण सोहळा साठी लोक प्रतिनिधी ची तारीख घेणे आदी विषयांवर सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी दिली. या नंतर तयार होत असलेल्या पाच खोल्याची पाहणी केली. यावेळी इतर संचालक मंडळानी आपले विचार मांडले. सचिव शालीकराम लिचडे यांनी सभा समाप्त झाल्याची घोषणा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष एल यु खोब्रागडे, सचिव शालीकराम लिचडे, सहसचिव सुखराम हरडे, यशोधरा ताई सोनवाने, संचालक संजय मुरकुटे, श्याम लिचडे, अतुल खोब्रागडे, मनोजकुमार भांडारकर, विणाताई सोनवाने, युवा समिती अध्यक्ष मनोज किरणापूरे, कोषाध्यक्ष चंद्रशेखर लिचडे, उपाध्यक्ष राजकुमार पेशने, सहसचिव देवानंद भांडारकर, संचालक गोपाल हजारे, शिवाजी सोनवाने, महिला समिती कोषाध्यक्ष गिताताई दहिकर, वत्सला पालांदुरकर, सुमन तिडके व इतर सदस्य उपस्थित होते.