गोंदिया जि.प.विषय समिती सभापतीपदी भाजपचे टेंभरे,सौ.पुराम,एनसीपीच्या सौ.सेठ व अपक्ष कुथे विजयी

0
687

गोंदिया,दि.२३:: गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४ विषय समिती सभापतीकरीता आज २३ मे रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसची युती कायम राहिली.सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत 2 भाजप,1 अपक्ष व 1 सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत समर्थन देणार्या चाबी संघटनेला मात्र सभापतीपद यावेळी मिळाले नाही,जेव्हा राजकीय वर्तुळात चाबी संघटनेला एक सभापतीपद राष्ट्रवादी देणार अशी चर्चा होती.मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीने सत्तेतील सहभागात मात्र चाबीला भाजपकरीता दूर ठेवले.आज झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून फुलचूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य संजयसिंह टेंभरे,देवरी तालुक्यातील पुराडा मतदारसंघाच्या सदस्य व माजी आमदारांच्या पत्नी सविता पुराम यांची महिला बालकल्याण सभापतीपदी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडवा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या पुजा अखिलेश सेठ यांची समाजकल्याण सभापती तसेच अपक्ष नागरा जिल्हा परिषद गटाचे सदस्य रुपेश रमेश कुथे यांचीही सभापतीपदी निवड झाली आहे.  कॉंग्रेसकडून उषा शहारे,छब्बुताई उईके,छाया नागपूरे व श्रीकांत घाटबांधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.उपाध्यक्ष इंजि.यशंवत गणीवर,सभापती संजय टेंभरे व सोनु कुथे यांना कोणत्या विभागाचा कार्यभार अध्यक्ष पंकज रहागंडाले सोपवतात याकडे लक्ष लागले आहे.